Monday, May 25, 2026

वंदे भारत: वंदन नक्की कोणाला? अन्‌ ‘भारत’ कुठाय?

२०१४ मध्ये जेव्हा विद्यमान सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले, त्यानंतर काही वर्षांनी 'वंदे भारत' नावाचे चकचकीत स्वप्न भारतीयांना दाखवले गेले. रेल्वेचा कायापालट करणार, डबे आधुनिक करणार, एकूणच प्रवाशांना 'स्वर्गाची अनुभूती' देणार, अशा गप्पा मारल्या गेल्या. सर्वसामान्य गाड्यांच्या दुप्पट-तिप्पट भाडं आकारणारी ही 'प्रीमियम' सेवा म्हणजे त्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. पण आज या गोष्टीला तब्बल १२ वर्षे झाली, तरी ते 'क्रांतीचे' उद्दिष्ट अजूनही एखाद्या मृगजळासारखेच दूर पळते आहे. भारतीय रेल्वेचा दर्जा अजूनही कित्येक दशके मागेच रेंगाळतो आहे, याची पुन:प्रचिती आमच्या नुकत्याच झालेल्या पुणे-नागपूर 'वंदे भारत'च्या सफरीत आली.

खरं तर, 'वंदे भारत' चा अर्थ होतो "मी भारताला वंदन करतो." ज्या देशाचे नाव ‘भरत’ नावाच्या अत्यंत न्यायप्रिय, पराक्रमी राजावरून पडले, ज्याने आपल्या कर्तृत्वाने या भूमीला वैभव मिळवून दिले. पण सद्यस्थिती पाहता, या गाडीला हे नाव देऊन सरकार नक्की कोणाला वंदन करते आहे, देव जाणे! कदाचित डोळे मिटून राष्ट्रवादाची अनुभूती घेण्यात हे सरकार मग्न असावे.

यापूर्वी मुंबईला जाताना वंदे भारतचा अनुभव जरा बरा होता. त्यामुळे आमची नागपूर गाडीकडूनही मोठी अपेक्षा होती. पण गाडीत पाऊल ठेवल्याक्षणी आमचा भ्रमनिरास झाला. डब्याची फरशी डागाळलेली, सीटवर कसले तरी चिवट डाग आणि स्वच्छतागृहाच्या आजूबाजूला एक दिव्य सुगंधी 'साम्राज्य' पसरलेले होते! मुळात भारतीय रेल्वेच्या कोणत्याही, अगदी महागड्या डब्यातीलही, स्वच्छतागृह वापरणे म्हणजे एक दिव्यच असते. ती नेहमीच सार्वजनिक शौचालयांसारखी दिसतात आणि तशीच सुवासिक असतात. पण 'वंदे भारत' मध्ये म्हणे अत्याधुनिक ऑक्युपन्सी इंडिकेटर (आत माणूस आहे की नाही हे दाखवणारा दिवा), बायो-टॉयलेट आणि ऑटोमॅटिक सरकते दरवाजे वगैरे आधुनिक सोयी आहेत, अशी आमची समजूत होती. नागपूर वंदे भारतने या समजुतीला सपशेल फाटा दिला. तो इंडिकेटर नावाचा दिवा कधीच कोमात गेला होता. त्यामुळे आत माणूस आहे की नाही, हे तपासण्यासाठी जुन्या रेल्वेसारखाच तो हँडलला खाडकन झटका देण्याचा पारंपारिक 'भारतीय प्रयोग' करावा लागत होता. आतली बांधणी तर इतकी सुमार होती की, गोष्टी स्क्रूने नीट बसवण्याऐवजी तिथे वेल्डिंगचे ओबडधोबड डाग मारलेले होते. आम्ही भारतीय शेवटी अशा दुरवस्थेला चटावलेलेच आहोत, नाही का? संपूर्ण प्रवासात या स्थितीत सुधारणा होण्याचे अजिबात चिन्ह नव्हते.

रेल्वेच्या जेवणाचा मला इतका तिरस्कार आहे की, पूर्वी मी प्रवासात उपाशी राहून नुसती फळं खाऊन दिवस काढले आहेत. (ती एक वेगळीच रडकथा आहे, ती कधीतरी नंतर सांगेन). पण 'वंदे भारत' सारख्या चकचकीत गाडीत किमान खाण्यालायक अन्न मिळेल, अशी भाबडी आशा होती. पुणे-मुंबई वंदे भारत यांसारख्या गाड्यांचे जेवण तरी किमान गिळण्यासारखे असते. पण इथले अन्न म्हणजे स्वयंपाककलेचा घोर अपमान होता! पोळ्या इतक्या जाड आणि चिवट होत्या की, त्या चावताना जबड्याचा व्यायाम व्हावा. रस्साभाजी इतकी तिखट होती की पोरांच्या डोळ्यातून पाणी आले. ब्रेड शिळा होता आणि कचोरीत सारणाचा पत्ताच नव्हता— फक्त तेलकट, जाड आणि कडक आवरणाचा मैद्याचा गोळा!

मेन्यूमध्ये काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका आल्यावरून आम्ही ऑनलाईन मेन्यू तपासला. तर काय! आम्हाला कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि बेक केलेले पदार्थ (Baked items) देण्याचे साफ टाळले गेले होते. जेव्हा आम्ही तिथल्या IRCTC च्या कर्मचाऱ्याला जाब विचारला, तेव्हा तो "ते सामान संपलंय साहेब..." असं काहीतरी पुटपुटला.

या सगळ्या कारभाराला कंटाळून आम्ही अखेर अधिकृत तक्रार नोंदवायचे ठरवले. त्यानंतर मात्र चक्रे अतिशय वेगाने फिरली— पण ती उलट्या दिशेने!

तक्रार दाखल होताच, अचानक तोच कर्मचारी संपूर्ण डब्यात चहाचे सॅशे आणि कोल्ड्रिंकची पाकिटे वाटण्यासाठी धावला. पण ते 'कोल्ड'-ड्रिंक इतके कोमट होते की, त्यामुळे उन्हाळ्यातही हुडहुडी भरावी. कॉफीचा पत्ताच नव्हता आणि साध्या ब्रेडलाच 'बेक केलेला पदार्थ' म्हणून आमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, त्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर त्यांची नावे दर्शवणाऱ्या नेमप्लेट नव्हत्या. त्यामुळे ते खरेच रेल्वेचे कर्मचारी होते की कोणाच्या ऐवजी बदली म्हणून आलेले पाहुणे कलाकार, हे ओळखणे कठीण होते. तक्रार मागे घ्यावी म्हणून ते आमच्यासमोर आर्जवे करत होते, "साहेब, नोकरी जाईल, कुटुंब रस्त्यावर येईल..." असे म्हणून गयावया करत होते आणि पाठीमागे फिरून छद्मीपणे हसत होते.

आम्ही तक्रार मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला, आणि मग मात्र प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. थेट IRCTC चे अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींनी माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधला! अर्थात, आमच्या PNR बुकिंगवरून त्यांना नंबर मिळाला असणार, पण प्रवाशांच्या वैयक्तिक माहितीचा असा वापर करून तक्रार मागे घेण्यासाठी थेट फोन करणे, हे ग्राहक सुरक्षेला हरताळ फासणारे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यातील एकाने तर सेवा सुमार असल्याबद्दल "तुम्हायला ऑन द स्पॉट पैशांचा परतावा (Refund) देतो, तक्रार मागे घ्या" अशी थेट ऑफरच दिली!

तेव्हा आमच्या लक्षात आले की, या गाडीत स्वच्छतागृहातील पाण्याचा जरी वेगाने 'निचरा' होत नसला, तरी प्रवाशांचे पैसे आणि रेल्वेची अब्रू मात्र अतिशय वेगाने वाहते आहे. एक साधा हिशोब केला, तर एका डब्यातील प्रवाशांना न मिळालेल्या मेन्यूमधील पदार्थांची किंमत हजारो रुपयांच्या घरात जाते. हेच गणित जर वर्षातील सर्व गाड्यांना लावले, तर हा आकडा लाखांच्या-कोटींच्या घरात जाईल. हा उघडउघड होणारा महसूल अपव्यय आहे. याशिवाय ती तुटलेली कुलुपे, निकामी इंडिकेटर्स, ओबडधोबड वेल्डिंग आणि अस्वच्छ डबे पाहता, प्रवासी प्रीमियम भाडे नक्की कशासाठी देत आहेत?

आजकाल सरकार नागरिकांना "परदेशी पर्यटनाला जाऊ नका, देशातच फिरा, त्यामुळे परकीय चलन आणि इंधन वाचेल" असा राष्ट्रप्रेमाचा डोस पाजत असते. पण ज्या देशाला स्वतःच्या हक्काच्या प्रवाशांना गेल्या १२ वर्षांत एक खात्रीशीर, स्वच्छ आणि दर्जेदार रेल्वे सेवा देता आलेली नाही, त्या सरकारला नागरिकांना असे सल्ले देण्याचा नैतिक अधिकार उरतो का?

आम्ही भरमसाठ कर (Taxes) भरायचे आणि उरलेल्या पैशांचे काय करायचे, हेही सरकारनेच सांगायचे का? युरोपियन रेल्वेचा प्रवास अत्यंत सुकर आणि उत्तम दर्जाचा असतो, मग भारतीय प्रवाशांनी या कचऱ्यासारख्या अनुभवासाठी वंदे भारतला का पसंती द्यावी? भारताबाहेर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित पर्यटन स्थळे असताना, इथल्या अस्वच्छ आणि दुरवस्था झालेल्या ठिकाणांना का भेटी द्याव्यात? भारतीय नागरिकांनी आपला कर प्रामाणिकपणे भरला आहे, आता उरलेला पैसा कुठे खर्च करायचा, हा त्यांचा संपूर्ण अधिकार आहे. आता सरकारने नागरिकांना देशभक्तीचे धडे देण्यापेक्षा, स्वतःचा कारभार सुधरवण्यावर आणि आम्ही मोजलेल्या पैशांचा योग्य मोबदला देण्यावर लक्ष केंद्रित करावे, हेच बरे!

Vande Bharat, but Where is the Glory?

When the government introduced the Vande Bharat trains a few years after coming to power in 2014, it promised a revolution for Indian Railways. The vision was grand: modern coaches, premium amenities, and a complete overhaul of the passenger experience. *Vande Bharat* translates to "I salute India"—a name deeply tied to King Bharat, the legendary, just, and brave ruler who brought immense glory to this land. It is a name that evokes pride, excellence, and high standards. Yet, more than a decade into this vision, the reality on the ground makes the choice of this name feel entirely unearned.

Positioned as a premium service—with tickets priced twice as high as regular trains—Vande Bharat was meant to be a showcase of modern Indian engineering and hospitality. Instead, a recent journey on the newly introduced Pune-Nagpur Vande Bharat re-emphasized a frustrating truth: premium branding cannot mask a fundamentally unchanged infrastructure.

Having previously had a decent experience traveling to Mumbai on a Vande Bharat, I boarded the Nagpur-bound train with high expectations. Unfortunately, disappointment set in the moment we stepped inside. The floors were visibly stained, the seats were soiled, and the toilets carried an immediate, repelling aura.

I generally dread using toilets on trains, even in executive classes; too often, they look and smell like neglected public conveniences. Vande Bharat was supposed to break this mold with modern occupancy indicators, bio-toilets, automated sliding doors, and better space management. However, the Nagpur Vande Bharat fell incredibly short. The occupancy indicators were broken, meaning passengers had to aggressively jolt the handle to check if a cubicle was occupied—just like on a regular train. The interior maintenance was shoddy, featuring crudely welded fittings instead of properly screwed-in fixtures. The toilets were poorly cleaned and emitted a foul odor. Despite the premium fare, the conditions hardly improved throughout our day-long journey.

The catering was equally disappointing. I have historically avoided Indian Railways meals, often preferring to travel with a bag of fruit. That said, one expects better quality from a premium service. While trains like the Pune-Hyderabad Shatabdi or the Mumbai Vande Bharat manage decent catering, the food served on this route was subpar. The rotis were thick and leathery, the curries were entirely too spicy for my children to eat, the bread was stale, and the kachoris consisted of nothing but a thick, oily, hard-to-chew crust with virtually no filling.

Suspecting that items were missing from the day's menu, we cross-referenced it online. Sure enough, we had not been served the promised coffee, cold drinks, or baked items. When confronted, the IRCTC staff offered vague mumbles about the items being unavailable.

Frustrated, we decided to register a formal complaint. That is when things moved quickly—but entirely in the wrong direction.

Suddenly, the staff rushed to distribute tea sachets and cold drink packets across the coach. The "cold" drinks, however, were practically warm, the coffee remained missing, and standard bread was apparently expected to pass as a "baked item." Furthermore, none of the service staff wore nameplates on their uniforms, making it impossible to verify who was officially on duty. They cycled through mumbling apologies and pleading for their jobs in front of us, only to smirk once they turned away.

When we refused to withdraw the complaint, the situation took an unsettling turn. Two individuals claiming to be IRCTC officers contacted me directly on my personal mobile number. While they obviously had access to my details via the booking PNR, using consumer data to directly call and persuade a passenger to drop a complaint feels like a breach of professional boundaries. Shockingly, one of them even offered a monetary refund on the spot as compensation to make the issue go away.

This interaction made me realize that while the toilets weren't draining efficiently, consumer value certainly was. A simple back-of-the-envelope calculation reveals a troubling picture: multiply the cost of those unserved menu items by the number of passengers on a single train, and the deficit quickly runs into thousands of rupees. Scale that across multiple routes over a year, and it represents a massive gap in accountability. Combined with the broken latches, non-functional indicators, crude welding, and uncleaned coaches, it is clear that passengers are paying premium prices for a service that is quietly cutting corners at every turn.

Lately, we have heard public narratives and government rhetoric urging citizens to vacation within India rather than heading abroad, citing the need to save foreign currency and conserve fuel. But given that the baseline domestic infrastructure cannot be reliably improved even after twelve years, one has to ask: does the government have the moral ground to make such demands?

Why should Indian taxpayers prefer Indian Railways when European rail networks offer a vastly superior, seamless experience? Why should citizens choose ill-maintained, poorly managed domestic transport and dirty destinations when cleaner, more beautiful international alternatives exist? Citizens pay incredibly high taxes, and the money they have left is theirs to spend as they see fit. It is high time the authorities stop lecturing citizens on patriotism and instead focus on getting their own act together to deliver the world-class service we are actually paying for.

Saturday, January 10, 2026

बिनकेसाचं मांजर



माझं नाव राज्याच्या गुणवत्ता यादीत आलं होतं. अभिनंदनाला आलेल्या लोकांना देण्यासाठी भरपूर पेढे घरी आणले होते. आमच्या मांजरांनी काही माझं अभिनंदन केलं नाही तरीही त्यांना यथेच्छ पेढे मिळाले. त्यांनीही कसलाही विचार न करता पेढ्यांवर ताव मारला. एरवी मांजरं खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ असतात. त्यांचं पोट भरलं की ती थांबतात. स्वतःचं पोट बिघडलं, सर्दी झाली किंवा काही त्रास झाला तर कोणतं गवत खायचं याची निसर्गदत्त जाण त्यांना असते. त्यामुळे आमच्या मांजरांसाठी आम्हाला कधी पशुवैद्याकडे (Vet) जावं लागलंच नाही. आमच्या घरी जर एखाद्या मुलाने मांजरांसारखे एकापाठोपाठ एक पेढे फस्त केले असते, तर त्यांना भरपूर ओरडा बसला असता. मांजरांच्या बाबतीत आमचा दृष्टिकोन वेगळा होता. आम्हाला वाटलं, त्यांना पचतंय म्हणूनच ती खातायत आणि उद्या काही त्रास झालाच, तर त्यांना स्वतःवर उपचार कसे करायचे हे माहिती आहेच! तसंही कोणाच्या उंचावलेल्या भुवयांची तमा मांजरं थोडीच बाळगतात.

पण आमचा हा समज लवकरच खोटा ठरला. एका मांजराचे अंगावरचे केस गळू लागले, तर दुसऱ्याला दिसेनासं झालं—ते ठार आंधळं झालं. आम्ही तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीअंती समजलं की दोघांनाही मधुमेह झाला आहे. लवकरच त्यांनी प्राण सोडले. माझ्या त्या यशाच्या आठवणींच्या मागे एक कायमचं शल्य उरलं.

नंतर एकदा मी माझा सहकारी जॉन याच्याशी याबद्दल बोललो. जॉन स्वतः एक मोठा मांजरप्रेमी असून त्याला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. त्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली—मांजरांना मुळात 'गोड' चव कळतच नाही! त्यांना प्रथिनांची (Proteins) ओढ असते. पेढे दुधाचे बनलेले असल्यामुळे त्यातील प्रथिनांसाठी ती हापापल्यासारखी पेढे खात होती. त्या पेढ्यात साखर आहे आणि ती आपल्यासाठी विष ठरू शकते, याची त्यांना साधी पुसटशी कल्पनाही नव्हती. हे कळल्यावर माझं मन थोडं हलकं झालं. त्या काळी जर आम्हाला हे माहित असतं, तर आम्ही त्यांना चुकूनही पेढा दिला नसता, तयांचा रुसवा सहन करूनही!

या घटनेमुळे जुन्या दोन आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तेव्हा 'कॅट फूड'चा जमाना नव्हता, त्यामुळे आम्ही मांजरांना सुकट द्यायचो. ते साठवायला सोपं असायचं आणि दीर्घकाळ टिकायचं. आम्ही स्वतः मासे खाणारे नसल्यामुळे आम्हाला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तिथेही आम्ही मांजरांच्या 'उपजत बुद्धी'वरच विसंबून राहिलो. मांजरं ती खारवलेली मासळी आवडीने खायची, पण नंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं की मासळी टिकवण्यासाठी लावलेलं मीठ त्यांना बाधत होतं. त्यानंतर आम्ही बिनमिठाची मासळी आणू लागलो आणि तो प्रश्न मिटला. दुसरी आठवण मात्र अधिक भीषण आहे. आमच्या नारळाच्या झाडांना आम्ही एक विशिष्ट खत घातलं होतं. त्यात माशांचे खवले आणि काही रासायनिक द्रव्ये होती. एका मांजराने माशांच्या वासाने ते खवले खाल्ले आणि त्यासोबत ते रसायनही पोटात गेलं. ते खत त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं. मांजरांना त्यांचं अन्न नीट कळतं, हा आमचा विश्वास तिसऱ्यांदा मोडीत निघाला होता.

आजकाल आपण ऐकतो की प्राण्यांनाही मानवासारखेच व्याधी जडू लागल्यात. पाळीव कुत्र्यांना 'ब्लड प्रेशर'चा त्रास होतोय, आमची मांजरं मधुमेहाने गेली, तर प्राणिसंग्रहालयातील वाघांना हृदयाचे विकार होतायत. उद्या कदाचित झेब्रालाही अल्सर होईल! निसर्गात मुक्त वावरताना त्यांची उपजत प्रवृत्ती (Instincts) त्यांचं रक्षण करते. पण एकदा का हे प्राणी मानवी संपर्कात आले, की त्यांची ती नैसर्गिक बुद्धी फारशी कामाला येत नाही. मानवी सहवासात आपण त्यांना नकळत असं काही 'विष' देतोय, ज्याच्याशी लढण्याची निसर्गदत्त ताकद त्यांच्याकडे नाही. माणूस स्वतः निर्माण केलेल्या कृत्रिम परिस्थितीशी जुळवून घेताना मेटाकुटीला आलाय, तरीही त्याला मुक्या प्राण्यांना त्याच चौकटीत ओढायचं आहे. याला आपण 'माया' म्हणू शकत नाही. त्यांना आपल्यासारखं बनवण्याचा हट्ट धरण्यापेक्षा, त्यांच्या मर्यादा समजून घेऊन आपणच त्यांच्याकडून काही शिकता आलं तर बघावं.

The Cat Who Lost Its Fur



I once appeared on the state merit list. As is custom in India, we celebrated by distributing pedhas—a sweet made of highly condensed milk—to relatives, family friends, and schools. Our home was filled with stacks of boxes. Anyone who came to congratulate me was offered a sweet. Our cats didn’t offer any congratulations, of course, but as members of the family, they received their share nonetheless.

They feasted upon them. Normally, cats are cautious eaters; they seem to know exactly when they are full and which herbs to chew to fix an upset stomach or a cold. Because of this natural wisdom, we rarely needed a veterinarian. While any child eating as many pedhas as those cats would have met a raised eyebrow and a confiscated sweet, the cats received different treatment. We assumed they knew their own limits and could fix any ailment that followed. We also knew they wouldn't have cared for our disapproval anyway—they knew their way around the house and were masters of their own lives.

However, we were soon proven wrong. One of our cats began losing its fur; another went blind. We rushed them to a vet, only to discover that both had developed diabetes. They passed away shortly after. My academic success unexpectedly left a trail of painful memories.

I eventually shared this story with my colleague John, a fellow cat lover who knows a great deal about them. He revealed a fact we hadn't known then: cats actually lack the sense of sweet taste. While they can sense proteins and fats, sugar is invisible to them. They ate the pedhas voraciously because they smelled the milk proteins, completely unaware that the sugar within was dangerous to them. Learning this eased my guilt slightly; had we known, we never would have fed them those sweets.

This realization brought back two other memories. At the time, commercial cat food was rare, so we fed our cats dried fish. Since we didn't eat fish ourselves, we knew little about it and relied on the cats' instincts. They ate the fish greedily, but soon began vomiting. A vet visit revealed the culprit: the high salt content used for preservation. We switched to unsalted dried fish, and they were fine.

The second memory was more gruesome. We had applied a special fertilizer to our coconut trees. It contained fish scales mixed with a chemical compound. One of our cats, attracted by the scent of the fish, ingested the fertilizer and was poisoned. Our belief that cats possessed an infallible instinct for what was safe had been proven wrong for a third time.

These days, we often hear of animals suffering from "psychosomatic" or human-environment diseases: pet dogs with high blood pressure, cats with diabetes, or tigers in zoos developing heart trouble. Perhaps one day we will hear of zebras with ulcers. In the wild, natural instincts are a shield. But once animals enter the human sphere, those instincts fail them. They cannot sense the hidden "poisons"—the sugars, salts, and chemicals—of a human environment.

Humans have struggled to cope with the artificial conditions we have created for ourselves, yet we continue to subject animals to them. True care is not about treating animals like humans; it is about respecting their biological boundaries. Perhaps, instead of trying to make them like us, we should try to learn something from them to solve our own problems.

Sunday, September 28, 2025

गवसले ते हरवले

 थंडी वाजली म्हणून सवयीने दोन पांघरुणे एकाला एक जोडून अंगावर घेतली. आतल्या गोधडीचा मऊपणा अंगाला जाणवला. एकदम लहानपण आठवलं. थंडीचा उबदारपणा आपल्याला पहिल्यांदा कधी जाणवला? ते आता स्मृतीच्या पानांमध्ये हरवून गेले आहे. पण, थंडीत पहाटे सायकलवरून शाळेत जाताना घातलेल्या स्वेटरची, हातमोज्यांची, रात्री अंगावर पांघरलेल्या दुलईची ऊब अजून आठवते आहे. गुलाबी थंडी अंगावर पांघरल्यावरचे सुखावणे अजून आठवते आहे. पण आताशा ते जाणवते कमी! ते सुख कुठेतरी हरवले आहे.  शिशिरातली थंडी अंगाभोवतीच फिरते आहे पण तिचा ऊबदारपणा मनापर्यंत पोहोचतच नाहीये, मधेच कुठेतरी लुप्त होतो आहे सरस्वतीसारखा! हे मला चार दोन वर्षांपूर्वी जाणवायला सुरुवात झाली. त्याआधी तो मनापर्यंत कधी पोहोचला होता हे आठवतच नव्हतं. त्यानंतर आज पुऩ्हा थंडीचा ऊबदार मऊ स्पर्श जाणवला. मन सुखावले. हरवलेले काहीतरी‌ पुऩ्हा गवसले. कशामुळे? म्हणजे लहानाचे मोठे होताना आणखी काहीतरी हरवले आहे. काय आणि कसे?

Monday, July 14, 2025

एक हायकू गुलाबासाठी


कधीतरी अचानक

बागेला आनंद होतो

मग फुलदाण्याही फुलतात बिचाऱ्या 

पावसाळ्यात जरा ऊन पडलं की फुलं उमलतात. मग फुलदाण्यांनापण ताजी फुले मिळतात. ते पाहून सुचलेली ही हायकू! AI ला सांगितलं तर ते लिहून देईल पण कल्पना सुचणं त्याच्या नशीबात नाही. फुलदाण्यांसारखंच तेही बिचारं!

Friday, May 09, 2025

हे घे

गीतरामायणात "दशरथा,  घे हे पायसदान" असे शब्द असलेले एक गाणे आहे.  ते गाणे हमखास अंताक्षरीत ' द' चे गाणे म्हणून गायले जाई आणि त्यातील शब्दांचा क्रम "घे हे" असा आहे का "हे घे" असा आहे याबद्दल हमखास वाद होई. पायसदानासाठी "हे" हे सर्वना गीतरामायणात "दशरथा,  घे हे पायसदान" असे शब्द असलेले एक गाणे आहे.  ते गाणे हमखास अंताक्षरीत ' द' चे गाणे म्हणून गायले जाई आणि त्यातील शब्दांचा क्रम "घे हे" असा आहे का "हे घे" असा आहे याबद्दल हमखास वाद होई. पायसदानासाठी "हे" हे सर्वनाम आहे का पायसदान देण्याच्या क्रियेसाठी यावरून त्याचा क्रम निश्चित करणे वगैरे वाद होऊन खेळणाऱ्या लोकांच्या वादपटुत्त्वावर ते गाणे घ्यायचे की नाही ते ठरे. या लेखाच्या शीर्षकाचा संबंध खेळाशी आहे पण अंताक्षरीशी नाही आणि गीतरामायणातील गाण्याशी नाही पण अर्थाशी मात्र आहे.

सदर खेळाचा शोध २० एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुपीक वेळी निव्वळ वेळ घालवणे या गरजेतून झाला. त्याअर्थी त्याचे अंताक्षरीशी जवळचे नाते आहे. हा खेळ चालता येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला खेळता येतो. यामुळे तो सर्वसमावेशक (inclusive) आणि वैश्विक आहे परंतु कोकणातली सुपारीची, काजूची बाग ही त्याची जन्मभूमी असल्याने त्याचे नाते कोकणाशी आणि तेथील लाल मातीशी घट्ट बांधले आहे. या खेळाची सुरुवात बागेत चक्कर मारण्यापासून होते. चक्कर मारतामारत बागेत पडलेल्या सुपाऱ्या, काजूच्या बिया, काहीच नाही‌ तर जमिनीतून वर आलेले कंद वेचावेत. ओंजळी आणि खिसे भरले किंवा कंटाळा आला की ते एकमेकांकडे "हे घे" असा उच्चारव करीत फेकावेत. ज्या व्यक्तीला उद्देशून ती हाळी‌ असेल त्याला हवेतून भिरभिरत येणाऱ्या त्या वस्तूच्या आवाजानेच ती हाळी आपल्यासाठी आहे हे कळते. व्याकरणाच्या नियमांचा विचार करण्याइतका वेळच मिळत नाही. तो करण्यात वेळ घालवल्यास कपाळमोक्ष होऊन "संप्राप्ते संनिहिते काले . . . " या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय येतो. त्यादृष्टीने हा खेळ अध्यात्मिकही आहे. हातातील फेकण्यायोग्य किंवा झेलण्यायोग्य वस्तू संपल्या तर त्या पुऩ्हा गोळा करण्यासाठी बागेत हिंडावे. हा खेळ कितीही काळ चालतो. पोटातील कावळे ओरडू लागले किंवा हातपाय बोलू लागले की आपल्याकडे गरगरत येणाऱ्या वस्तू चुकवत बागेतून खेळाडू बाहेर पडू लागले की हा खेळ संपतो.

हा खेळ डोक्यापेक्षा हातपाय चालवण्याचा असल्याने आणि त्यात डोके चालवण्यापेक्षा गमावण्याची‌ भीती जास्त असल्याने या खेळाचे नाव "हे घे"‌ असावे का "घे हे"‌ असावे असा वाद अजून उत्पन्न झालेला नाही. कदाचित भविष्यातील इतिहासकार, ज्यांना डोके चालवण्यात जास्त रस असेल, ते हा वाद निर्माण करतील अथवा व्यापारी व्यापारासाठी "हे घे" आणि "घे हे"‌ असे दोन वेगवेगळे खेळही निर्माण करतील. तोवर या बिनखर्चिक बिनडोक खेळाची मजा आपण घ्यावी असा आग्रह आहे. बागेच्या मालकाने खेळासाठी मैदान उपलब्ध केल्याबद्दल त्याला कृतज्ञता म्हणून वेचलेल्या सुपाऱ्या, काजूबिया वगैरे जरूर परत द्याव्यात ही विनंती.