माझ्या आत्याची ही दुसरी कविता. माझे काका सदानंद बर्वे हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागातील अधिकारी. त्यामुळे राजकारणाचे सामान्य नागरिकांना भोगावे लागणारे परिणाम तर होतेच पण दुसरे परिणाम नोकरीतही दिसत असावेत. दोन्ही अनुभव या कवितेत दिसतात. "जग हे बंदीशाला" या परिचित गाण्याच्या चालीवर ही कविता शब्दबद्ध केली आहे.
खुर्ची प्यारी यांना,खुर्ची प्यारी यांना
कुणी न येथे भला चांगला,जो तो बरबटलेला ।।
ज्याची त्याला प्यारी खुर्ची।भोवतालची जी, हुजुरजी
नाना लफडी आणि कुलंगडी, करता हा ना दमला।।१।।
जो तो खुर्चीसाठी झगडे, नजर न धावे तिच्या पलिकडे
खुर्चीवरती बसुनी सुखे हे ,करीति लीला नाना।।२।।
गरीबाला ना वाली उरला, जगला वाचला अथवा मेला
फिकीर त्याची यांस कशाला? पैशावरती डोळा।।३।।
जनतेची ना यांना परवा, निवडणुकीतच तिला आठवा
सत्ता मिळता खुशाल तुडवा, पायतळी हो तिजला।।४।।
No comments:
Post a Comment