थंडी वाजली म्हणून सवयीने दोन पांघरुणे एकाला एक जोडून अंगावर घेतली. आतल्या गोधडीचा मऊपणा अंगाला जाणवला. एकदम लहानपण आठवलं. थंडीचा उबदारपणा आपल्याला पहिल्यांदा कधी जाणवला? ते आता स्मृतीच्या पानांमध्ये हरवून गेले आहे. पण, थंडीत पहाटे सायकलवरून शाळेत जाताना घातलेल्या स्वेटरची, हातमोज्यांची, रात्री अंगावर पांघरलेल्या दुलईची ऊब अजून आठवते आहे. गुलाबी थंडी अंगावर पांघरल्यावरचे सुखावणे अजून आठवते आहे. पण आताशा ते जाणवते कमी! ते सुख कुठेतरी हरवले आहे. शिशिरातली थंडी अंगाभोवतीच फिरते आहे पण तिचा ऊबदारपणा मनापर्यंत पोहोचतच नाहीये, मधेच कुठेतरी लुप्त होतो आहे सरस्वतीसारखा! हे मला चार दोन वर्षांपूर्वी जाणवायला सुरुवात झाली. त्याआधी तो मनापर्यंत कधी पोहोचला होता हे आठवतच नव्हतं. त्यानंतर आज पुऩ्हा थंडीचा ऊबदार मऊ स्पर्श जाणवला. मन सुखावले. हरवलेले काहीतरी पुऩ्हा गवसले. कशामुळे? म्हणजे लहानाचे मोठे होताना आणखी काहीतरी हरवले आहे. काय आणि कसे?
No comments:
Post a Comment